Sarathi Foundation (Not Verified)
About Us
'मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान'च्या ध्येयाने प्रेरित होऊन मागील १७ वर्षांपासून नियमितपणे प्रकाशित होत असलेले आपले मासिक 'आधुनिक सारथी' सामान्यांतून 'मास लीडर' घडविण्याच्या उद्देशाने विशेष प्रयत्नशील आहे. शाळकरी मुले, महाविद्यालयीन युवक-युवती, पालक, शिक्षक आदींना जीवनात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त माहिती, प्रेरणादायी लेख 'आधुनिक सारथी' मध्ये विविध विभागातून रंजकरित्या मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. जीवनात मोठे यश मिळविण्यासाठी आपल्यातील उपजत दोष कमी करत चांगले गुण व सवयी विकसित करता आल्या पाहिजेत. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक विकास साधता आला पाहिजे. यासाठी 'आधुनिक सारथी' सर्वार्थाने वाचकांना उपयुक्त आहे.
तरी आजच सभासद होऊन घरपोच मासिक 'आधुनिक सारथी' मिळवा आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचा सर्वांगीण विकास साधा.